Breaking News

टाकळी ढोकेश्‍वर गटात विविध विकास कामे : एकनाथ शिंदे


तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर जि.प. गटात पाच कोटींच्या विकासकामाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडले.टाकळी ढोकेश्‍वर गटातील खडकवाडी, कामठवाडी, वारणवाडी याठिकाणी जलयुक्त शिवार योजना अभियानांतर्गत नदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत बंधारे व पळसपूर ते पोखरी रस्ता डांबरीकरण आदी कामाचे भूमिपूजन समारंभ शिंदे यांच्या हस्ते झाला.

यावेळी आ. विजय औटी, जि.प. सदस्य काशिनाथ दाते, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, बाबासाहेब तांबे, तालुकाप्रमुख विकास रोहकले, शिवजी बेलकर, सावकार बुचुडे, श्रीकांत पठारे, सुरेश बोरुडे, ताराबाई चौधरी, सरूबाई वाघ, अशोक कटारिया, डॉ. राजेश भंनगडे, अ‍ॅड. राहुल झावरे, शाहीर गायकवाड, सीमा औटी, निलेश खोडदे आदी उपस्थित होते.

जि. प. सदस्य काशीनाथ दाते यांनी टाकळी ढोकेश्‍वर गटाची इत्यंभूत माहिती दिली. तसेच या भागातील आदिवासी बांधवांच्या व्यथा मंत्र्यांसमोर सविस्तर मांडल्या. आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा विकास केल्याचे सांगीतले. या विकास कामांना आ. विजय औटी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगीतले. तर आ. औटी म्हणाले की, आता आपली निवडणूक सुरु झाली आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी आपल्याकडे विकास कामांसाठी आहे. या दुर्गम भागातील आदीवासी बांधवांसाठी रस्ते, जलयुक्त शिवार योजनांची कामे, अशी कामे प्राधान्याने करण्याचे सुतोवाच केले.विरोधकांवर टिका करताना म्हटले की, काहींच्या डोक्यात वेगळीच हवा गेली आहे. विधानसभा निवडणूक ही काय गळ्यात घंटा बांधून फिरण्याचे काम नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही सत्तेत असताना देखील कुचकामी ठरलात परंतू शिवसेना असा पक्ष आहे की, विरोधासाठी जनतेच्या हिताचे कामे करत होता. सत्तेत असतानाही चोखपणे करत आहे. शिवसेनेच्या प्रयत्नामुळे शेतकरी यांची कर्जमाफी एक लाखावरुन दिड लाखापर्यंत झाली. तालुक्यात विकास कामासाठी निधी कसा खेचून आणायचा याचे आमदार ज्वलंत उदाहरण आहे. विधानसभेत काम करत असताना आ. औटी यांच्या आभ्यासू वृत्तीचा फायदा सेनेला होत असतो.