Breaking News

चिनी प्रयोगशाळा पॉसिफिक महासागरात कोसळली

मुंबई : चीनची प्रयोगशाळा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चिनी स्पेस स्टेशनचे तुकडे झाले आणि पॅसिफिक महासागरात कोसळले. टीयाँगाँग हे चिनी स्पेस स्टेशन साधारण स्कूल बसच्या आकाराचे होते. इस्टर्न डे टाईमनुसार रविवार एक एप्रिलच्या रात्री 8 वाजून 16 मिनिटांनी म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5 वाजून 16 मिनिटांनी दक्षिण प्रशांत महासागरात कोसळलं. टीयाँगाँग 34 फूट लांब आणि 11 फूट रुंद होते, तर त्याचे वजन 9 टनापेक्षा जास्त होते. या स्पेस स्टेशनच्या संभाव्य मार्गात मुंबईसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर अशा पट्ट्याचा समावेश होता. सोमवारी पहाटे चार वाजून 55 मिनिटांनी ही प्रयोगशाळा कोसळण्याचा अंदाज वर्तवला गेला होता. स्पेस स्टेशनचा वेग पाहता, ते नेमकं कुठे पडेल, याचा अंदाज बांधणं कठीण होते. या प्रयोगशाळेचे तुकडे 200 ते 300 किलोमीटर परिसरात पसरण्याची भीती होती.