Breaking News

काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्षपदी मुजम्मिल सय्यद


संगमनेर / प्रतिनिधी  - पारनेर तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी मुजम्मिल मुस्ताफा सय्यद यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी प्रथमेश संजय सोनवणे, अक्षय बबन चासकर आणि सचिवपदी अनिकेत नवनाथ गोरे यांची निवड करण्यात आली. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आली.

माजी महसूलमंत्री आ. थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या.यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अनिस शेख, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, पारनेर साजिद तांबोळी, मोसीम इनामदार, इमरान सय्यद, सोहेब शेख, इमरान मोमीन, इस्मलम इनामदार, शाहबाज सय्यद, अक्षय चासकर, मुजाफ्फर तांबोळी, अनिकेत चामकर, आबु तांबोळी, वसीम जहागीरदार, गणेश गजरे, विक्रम चासकर, गोविंद चासकर, संतोष नरसाळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षात काम करताना निष्ठेने व सर्व समाजाला बरोबर घेऊन तसेच अल्पसंख्यांक विभागातील सर्व घटकांमध्ये संघटनात्मक काम करा, असे सांगून आ. थोरात यांनी या सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आ. थोरात यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱयांचा यावेळी सत्कार करण्यात आला.