Breaking News

सरकारने शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहिलेच पाहिजे : आ. थोरात


संगमनेर, साखर कारखानदारीत रात्रंदिवस अनेक चाके फिरत असतात. अनेक लोक राबत असतांना १७५ दिवसांचा हंगाम निर्विघ्णपणे पार पडला. या हंगामात विक्रमी ११ लाख ४१ हजार साखर पोत्यांचे गाळप झाले. ऊसाचे पीक आणि दूध धंदा यातून शाश्‍वत उत्पन्न मिळते. मात्र शेती आणि शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहिलेच पाहिजे, अशी अपेक्षा माजी महसूल आणि कृषीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. 
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या या वर्षीच्या गळित हंगामाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. माधवराव कानवडे होते. व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, रणजितसिंह देशमुख, शिवाजीराव थोरात, भाऊसाहेब कुटे, रामदास वाघ, हरिभाऊ वर्पे, मधुकरराव नवले, शंकर खेमनर, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजित थोरात, अमित पंडित, अजय फटांगरे, आर. बी. रहाणे, पांडूरंग कोकणे, प्रकाश नवले, सुधीर उगले, नवनाथ अरगडे, साहेबराव गडाख, चंद्रकांत कडलग, सुधाकर रोहम, पांडूरंग कोकणे, राजेंद्र कडलग, जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. यावेळी आ. थोरात यांच्या हस्ते कारखान्याच्या गव्हाणीमध्ये मुळी टाकून गळित हंगामाची सांगता करण्यात आली. आ. थोरात म्हणाले, यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. ऊसाचे उत्पादन वाढले आहे. येथे साखर उताराही ११. ४८ इतका मिळाला. मात्र सध्याच्या सरकारचे धोरणे अगदी चुकीचे आहे. ग्राहकांना स्वस्त देण्याच्या नादात शेतकरी भरडला जात आहे. टॉमेटो, कांदा, डाळिंब, तूर या सर्व पिकांचे भाव कोसळले आहेत. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, अ‍ॅड. माधवराव कानवडे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले.