Breaking News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी दिगंबर पवार


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्षपदी पुनतगाव येथील दिगंबर धर्माजी पवार यांची निवड जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी केलेल्या शिफारशीनुसार मनसेचे राज्यसरचिटणीस रिटाताई गुप्ता, राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे, योगेश परुळकर यांनी केली आहे.

मनसेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी दिगंबर पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, विलास देशमुख, तालुका उपाध्यक्ष दीपक परदेशी, शहराध्यक्ष संतोष गव्हाणे,वाहतूक सेनेचे दादा देशमुख, विभागध्यक्ष अमोल कपिले, रविंद्र पिंपळे, वसीम इनामदार, तालुकउपाध्यक्ष इसाकभाई इनामदार, भगवान सानप, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रजनीताई पंडुरे तालुकाध्यक्षा ,अर्चना गव्हाणे यांनी अभिनंदन केले आहे. नेवासा तालुक्यात पुन्हा जोमाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद उभी करण्यासाठी आपण सर्वसामान्य माणूस शेतकरी मजूर, शेतकरी केंद्रबिंदू मानून विविध प्रश्‍नांसाठी लढा उभा करून न्याय देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिगंबर पवार यांनी निवडीनंतर बोलतांना दिली.