वाळूतस्करांची मुजोरी ; तहसीलच्या आवारातून वाहने पळविली
महसूलने जप्त केलेला सुमारे ४५ लाखांचा मुद्देमाल लंपास झाला असून पोलिस वाहने पळविणारयाचा शोध घेत आहेत. राहुरीच्या महसूल पथकाने वर्षभरात शासनाची चोरटी वाळू वाहतूक करणारया वाहनावर तहसिलदार अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करण्यात आली. वाळू तस्करीला त्यांनी एकप्रकारे लगाम घातला आहे. मात्र तरीही अल्पावधीत व कमी श्रमात भरपूर रक्कम मिळत असल्याने मूजोर झालेल्या वाळू तस्कराकडून महसुल व पोलिस प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करत आहेत. मुळा व प्रवरा नदीपात्रातून चोरट्या मार्गाने वाळू उपसा सुरुच आहे. महसूल व पोलिस प्रशासनाने एक मोहित हाती घेत वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी उपयोजना राबवाव्यात, अशी मागणी समोर आली आहे.
राहुरी महसुल पथकाने चोरटी वाळू वाहतूक करणारया वाहनावर कारवाई केली. या कारवाईत जप्त केलेली अनेक वाहने तहसील कार्यालयात लावण्यात आली होती. यामध्ये महसूलने अचानक पाहणी केली असता लक्षात आले, की जप्त केलेली वाळूची १० वाहने पळवून नेली आहेत. यावेळी महसुलचे लिपिक श्रीकृष्ण सावळे यांनी तहसिलदार अनिल दौंडे यांच्या आदेशाने राहुरी पोलिस ठाण्यात वाहने लंपास करणारया वाळू तस्कराविरोधात फिर्याद दिली. यामधे उत्तम जयवंत बर्डे {रा. ताहाराबाद ता. राहुरी} याचा डंपर {क्र. एम. एच. १७ बी डी ०५३६}, नितीन विनायक मकासरे {रा. तांदूळवाडी ता. राहुरी} टेम्पो {क्र. एम. एच. १७ ए. व्ही. ३६११} संकेत बाळू चेमटे {डंपर क्र. एम. १६ बी. सी. १५५०}, महेश सोनवने {रा. चिंचोली ता. राहुरी} ट्रक {क्र. एम. एच. ४१ जी ६९६७}, नितीन श्रीधर भांबळ {रा. देहरे ता. नगर} याचा डंपर {क्र. एम. एच. २० बी. टी. १४९}, श्रीकांत बबन चांदने {रा. देहरे, टेंम्पो क्र. एम. एच. १६ ए. ई. ९३९७} प्रविण बबन म्हस्के {रा. राहुरी खुर्द ता. राहुरी, टेंम्पो {क्र. एम. एच. १४ ए. एस. ७२४६}, महेश सुदाम हांडाळ अशी तहसील आवारातून वाहने चोरुन नेणारयांची नावे आहेत. या घटनेचा तपास पो. नि. प्रमोद वाघ यांच्या मार्शनाखाली राहुल कदम हे करत आहेत.