… शिवसैनिक नगर पालिकेला टाळे ठोकणार : खेवरे
उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे (शिवसेना), नगरससेवक सागर लुटे (शिवसेना ), सचिन गाडेकर (भाजपा), बाळासाहेब गिधाड (रासप) व शिवसेना कार्यकर्ते भागवत लांडगे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन सर्व सामान्य जनतेचा आवाज दडपण्याचा पालिका प्रशासनाने प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ शनिवारी {दि.२१} राहता येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्यावतीने मोर्चा काढून नगर-मनमाड महामार्गावर शिवाजी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दुषित पाणी पुरवठा होत असल्याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेले असता लोकप्रितिनिधींवर गुन्हे दाखल केले गेले. ही लोकशाहीची मुस्कटदाबी आहे. स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा हा प्रकार आहे. पोलीसांनी असे गुन्हे दाखल करण्यापूर्वी सत्यत्ता पडताळून पाहणे आवश्यक आहे. राजकीय दबावाला बळी पडून असे गुन्हे दाखल होत असतील तर जिल्ह्यातील शिवसेना पठारे व त्यांच्या सहकार्यांच्या मागे ठामपणे उभी राहील. माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, विनायकराव निकाळे, भाजपाचे सरचिटणीस संजय सोमवंशी, राजेंद्र आग्रवाल, नगरसेविका शारदा गिधाड, शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा अनिता जगताप, मनसेचे रामनाथ सदाफळ, लक्ष्मीबाई पठारे आदींनी मनोगत व्यक्त केले. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना निवेदन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. प्रारंभी वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात एकत्र जमवून नंतर मोर्चाने शहरातून हातात काळे झेंडे घेऊन व दुषित पाण्याचे जार हातगाडीवर ठेवून गावभर मोर्चा काढण्यात आला त्यानंतर शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करुन पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध केला.