Breaking News

काँग्रेस आगामी काळात निवडणूका लढविण्याच्या स्थितीत नसेल - योगी आदित्यनाथ


कर्नाटकात भारतीय जनता पक्ष बहुमताने सत्तेवर येईल. त्यानंतर काँग्रेस आगामी काळात निवडणूका लढविण्याच्या स्थितीत नसेल असे भाकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वर्तवले. सुलतानपूरच्या दौऱ्यावर आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. योगी म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या योजनाची माहिती घेण्यासाठी विविध भागाचा दौरा करत आहे.