Breaking News

प्रवरा कृषी संलग्नित महाविद्यालयाचा शैक्षणिक करार.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाद्वारे ट्रायबोनिक्स ऍग्री एक्स्पर्ट प्रा. लि. संगमनेर आणि रेसिडू फ्री ऑरगॅनिक मिशन फेडरेशन, पुणे या नामांकित कंपन्यांशी औद्योगिक -शैक्षणिक सामंजस्य करार झाला असल्याची माहिती प्रा. निलेश दळे यांनी दिली.


या सामंजस्य काराराद्वारे संस्थेअंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा, शेतकरी मेळावे, विस्तार शिक्षण, अनुभवी उद्योजकांचे मार्गदर्शन व नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती रेसिडू फ्री ऑरगॅनिक मिशन फेडरेशन चे चेरमन डॉ. प्रशांत नाईकवाडे यांनी दिली. राज्याचे विरोधीपक्ष नेते मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून विविध सामंजस्य काराराद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृषिचे आद्यवत व सखोल ज्ञान मिळावे या हेतूने यांनी या उपक्रमास प्रोत्साहन दिले आहे.
कृषी व्यवसाय व्यवस्थापन चे प्राचार्य डॉ.सचिन गोंदकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ .गोवर्धन खंडागळे,जैवतंत्रज्ञानचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी करारवर स्वाक्षऱ्या केल्या.या कारारासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट अधिकारी प्रा.अमोल सावंत, प्रा.विक्रम राऊत आणि प्रा.सत्यन खर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.या सामंजस्य करारचे समन्वयक प्रा.रमेश जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार मानले.