Breaking News

नंदुरबार येथे ट्रकमधील फ्रिजला आग;लाखोचे नुकसान

नंदुरबार, दि. 10 एप्रिल -  नंदुरबार शहरातील घोडामीलजवळ इलेक्ट्रीक वारयच्या स्पर्शामुळे ट्रकमधील फ्रिजला आग लागली. यात लाखो रुपयांचे फ्रिज जळाले आहेत. फ्रिजने भरलेल्या ट्रक जात असतांना इलेक्ट्रीक वायरचा ट्रकमधील फ्रिज असलेल्या खोक्यांना स्पर्श झाल्याने, खोक्याने अचानक पेट घेतला. उष्णतेमुळे लगेच आजुबाजूच्या खोक्यांनाही आग लागली व यात काही फ्रिज पूर्णपणे जळून खाक झाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.