पारगाव खंडाळा जवळील भीषण अपघातात 18 जण ठार, 20 जखमी
सातारा, दि. 10 एप्रिल - बंगलोर महामार्गावर खंडाळा येथील धोकादायक एस कंगळवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास मजूर घेऊन निघालेला टेम्पोला अपघात झाला. या भीषण अपघातात 18 मजूर ठार तर 20 मजूर जखमी झाले आहेत. मृतामध्ये 8 महिला, 5 लहान मुले आणि पुरुषांचा समावेश आहे.
मिळालेली माहितीनुसार, कर्नाटकमधून टेम्पो क्र. घ- 37- 6037 हा 16 कुटुंब मजूर घेऊन शिरवळ एमआयडीसीमध्येचालला होता.पहाटेच्या वेळी 5.30 वाजता हा अपघात झाला. सर्व मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अपघातस्थळी रक्ताचा सडा आणि मावसाचे तुकडे विखुरलेले होते. लहान मुलांचे पडलेले मृतदेह बघून अनेकांची मने हेलावून टाकत होते.
यापूर्वी याच एस धोकादायक वळणावर 100 च्यावर बळी गेले आहेत. तरी जिल्हा प्रशासनास जग येत नाही. कुंभकर्णी झोपेतील रस्ते विकास महामंडळ आणखी किती जणांचे बळी घेणार आहे. महामार्ग अधिकारी याच्यावरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.
कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथून शिरवळच्या औद्योगिक वसाहतीत कामासाठी ते कामगार निघाले होते. मालवाहतूक करणार्या या टेम्पोत ( केए - 37 / 6037 ) 35पेक्षाही जास्त कामगार दाटीवाटीने बसले होते. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर नेहमीच्या अपघातग्रस्त एस कॉर्नरवर हा भरधाव टेम्पो उलटला.रस्त्याच्या कडेला बांधलेल्या सहा फुटी कठड्यावरून हा टेम्पोफेकला गेला. टेम्पोत बांधकामाचे अवजड साहित्य असल्यामुळे यातील कामगारांना याचा फटका बसला. चार महिला अन् एक मुलगा यांच्यासह सुमारे 18 जण जागीच ठार तर बाकीचे 20 गंभीर जखमी झाले.
मृतांमधील सर्वजण मदभावी तांडा नं. 1 (विजापुर) येथील रहिवाशी होते. सेंट्रींग व कॉक्रीटीकरणाच्या कामासाठी ते पुण्याकडे येत होते. हा अपघात इतका भयानक होता की मृतदेहांचे तुकडे झाले होते. मृतांमध्ये टेम्पो ची समावेश आहे. या अपघातानंतर घटनास्थळी आक्रोश सुरू झाला. दरम्यान याच टेम्पोच्या पाठीमागून येणार्या त्यांच्याच टोळीतील दोघा दुचाकीस्वारांनी तात्काळ ही घटना खंडाळ्याला येऊन पोलिसांना सांगितली. सहाय्यक पोलीस अधीक्षक विजय पवार, खंडाळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे अन् त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खंडाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. शेळी मात्र बचावली.