राहुरी (विशेष प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप, विधानपरिषद आमदार अरुणकाका जगताप, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष व माजी आमदार दादाभाऊ कळमकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांचा राहुरीत राष्ट्रवादी काॅग्रेसच्यावतीने निषेध करण्यात येवून हे गून्हे मागे घेण्यात यावे अशी मागणीचे निवेदन तहसिलदार राहुरी यांना देण्यात आले . काल बुधवार दि. ११ एप्रिल २०१८ रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय राहुरी आणि पोलीस स्टेशन राहुरी येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमृत धुमाळ , प्रांतिक सदस्य शिवाजीराजे गाडे , माजी जि. प. अध्यक्ष अरूण कडू , अजित कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवार्दी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी तहसिलदार यांना निवेदन दिले.राजकिय द्वेशातून सदर खोटे गुन्हे दाखल करण्यात येवुन पक्षाची बदनामी करण्याचे षडयंञ खेळले गेलेले आहे.केडगावची झालेली घटना व पोलिस अधिक्षक कार्यालयाची तोडफोड हे प्रकरण दुर्दैवी आहे माञ या प्रकरणात कोणताही संबंध नसतांना आ. संग्रामभैय्या जगताप , आ. अरूणकाका जगताप , माजी आ. दादाभाऊ कळमकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे गोवण्यात आली असुन सदर खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या वेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा सरचिटणिस किशोर जाधव, जितेन्द्र इंगळे , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. भाऊसाहेब धर्माजी पवार , ,शिवाजी सागर, युवक तालुकाध्यक्ष विजय पा. कातोरे,जयंत सुपेकर , वसीम सय्यद , किशोर भांड , अशोक मुसमाडे , दिलीपराव गोसावी , पं. स. सदस्य बाळासाहेब लटके , निवृत्ती आढाव , काकासाहेब पवार , केदार चव्हाण , बाबासाहेब पवार , मधुकर पवार , बाळासाहेब क्षिरसागर आदी उपस्थित होते.निवासी नायब तहसिलदार श्रीमती चौधरी यांनी निवेदन स्विकारले.