Breaking News

वाळु तस्‍करी साडेआठ लाखाचा दंड- न्‍यायालयातुन झटपट सुटण्याचा मार्ग बंद


उन्‍हाचा तडका वाढला, बंधारे आटल्याने वाळु तस्‍करीला उधान आले आले असुन महसुल खाते जागे झाले असुन बखब-याकडून मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे तालुक्‍यातील कोळगाव थडीच्‍या गोदापात्रात धाड टाकुन कोपरगा तहलिदार पथकाने ६ ट्रॅक्टर,१ बुलेट व ३ मोटारसायकली ताब्यात घेऊन अंदाजे २० लाखाचा मुद्देमाल जप्‍त केला. तर पकडलेल्‍या ट्रॅक्‍टर मालकाला प्रत्‍येकी १ लाख ३७ हजार रूपयांचा शासकीय दंड ठोठावुन अंदाजे साडेआठ लाखाची कमाई केली आहे. यावेळी पोलीसांत गुन्‍हा न नोंदविता वाहने महसुलने आपल्‍याच ताब्‍यात ठेवण्याचा नवा फंडा वापरून न्‍यायालयातुन झटपट सुटण्याचा मार्ग बंद करून वाळु तस्‍करांची मोठी कोंडी केली आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील गोदावरी नदी पात्रातुन व जवळच्या वन विभागाच्या जमिनीतुन अवैद्य वाळु तस्करी करीत असल्याची माहीती तहसिलदार किशोर कदम यांना समजली. महसुल विभागाच्या १८ कर्मचा-यांच्या पथकाने बुधवार दि. ११ एप्रिल २०१८ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पथकासह जावुन नदीपात्र व परिसरात धाड टाकुन तब्बल ६ ट्रॅक्टर,१ बुलेट व ३ मोटारसायकली ताब्यात घेतल्या. रात्री अंधाराचा फायदा घेवून वाळ चोरटे पळुन जाण्यात यशस्वी झाली आहेत. रात्री ११ पासुन पहाटे ५ वाजे पर्यंत वाळू तस्कर,वाहन चालक, ट्रॅक्टर व मोटारसायकलींची धरपकड सुरू होती. पकडलेल्या ट्रॅक्टरचे मालक व चालक कोण आहेत. याचा शोध महसुलचे कर्मचारी घेत आहेत. पकडलेल्या ६ ट्रक्टर व ट्रॉल्या विना नंबर प्लेटच्या आहेत. १८ जणांच्या पथकाने ही धाडशी कारवाई केली. महसुल पथकाचे प्रमुख तहसिलदार किशोर कदम,२ मंडल अधिकारी, ६ तलाठी,८ कार्यालयीन कर्मचारी यांचा या पथकामध्ये समावेश होता.