Breaking News

बिहार जातीय हिंसाचार : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाची शरणागती


पाटणा : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील नाथनगरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी जातीय हिंसाचाराची घटना घडली होती. या घटनेतील आरोपी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते अर्जित शाश्‍वत यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली.

 केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्‍विनी चौबे हे अर्जित यांचे वडील आहेत. पाटणा रेल्वे स्थानकाजवळील महावीर मंदीराबाहेर अर्जीत यांनी शरणागती पत्करली. यावेळी ते जय श्री राम आणि भारत माता की जय अशा घोषणा देत होते, असे जिल्हा पोलीस अधिकारी राकेश दुबे यांनी म्हटले आहे. रविवारी अर्जीतला बिहार न्यायालयासमोर हजर केले जाईल. शाश्‍वतवर 17 मार्चला भागलपूरच्या नाथनगरमध्ये प्रशासनाची परवानगी न घेता मिरवणूक काढल्याचा आणि जातीय हिंसाचार भडकावण्याचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांनी दिवाणी न्यायालयाकडे जामीन अर्ज केला होता. यावर सुनावणी करताना, न्यायालयाने त्यांच्या अटकेसाठी 27 मार्चला अटक वॉरंट बजावले.