Breaking News

काश्मीरमध्ये 11 दहशतवाद्यांचा खात्मा


मुंबई : काश्मीरच्या शोपियाँ आणि अनंतनागमध्ये एकूण 11 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. दक्षिण काश्मीरमध्ये काल सकाळपासून मोठ्या प्रमाणावर दहशतवाद विरोधी कारवाया सुरू आहेत. त्यात 11 दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला मोठे यश आले आहे.

शोपियान जिल्ह्यातल्या द्रगड गावात 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, तर अनंतनागच्या दियालगाममध्ये एकाला ठार करण्यात आलं आहे. एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यातही लष्कराला यश आलं आहे. त्याचबरोबर सुरक्षा दलांनी अतिरेकींकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि हत्यारं जप्त केली आहेत. राज्याचे डीजीपी एसपी वैद्य यांनी सांगितले की, ठार झालेल्या अतिरेकींमध्ये दोन प्रमुख कमांडरही मारले गेले आहेत. याशिवाय, शोपियांमध्ये कचदूरामध्ये सुरक्षा दलांमध्ये आणि दुकांनामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. त्यात काही स्थानिक नागरिकही अडकल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, श्रीनगर आणि बनिहालमधली रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. तर दक्षिण श्रीनगरमध्ये इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.

सैन्याच्या राजपूताना रायफल्समधील लेफ्टनंट उमर फयाझ यांची मे 2017 मध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली होती. दहशतवाद्यांनी उमर फयाझ यांचे कुलगाममधील राहत्या घरातूवन अपहरण केले. उमर घरात आहे का अशी विचारणा करत दहशतवादी घरात घुसले आणि मग त्यांनी फयाझ यांचे अपहरण केले. यानंतर फयाझ यांना निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आला. सैन्यात भरती झाल्यावर पहिल्यांदाच फयाझ रजा घेऊन घरी आले होते. या घटनेनंतर दहशतवाद्यांविरोधात रोष निर्माण झाला होता.लेफ्टनंट फयाझ यांच्या मृत्यूला 11 महिने पूर्ण होत असतानाच भारतीय सुरक्षा दलांनी फयाझ यांच्या हत्येत सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.