Breaking News

‘करंजी ते उक्कडगांव’साठी पालखेडचे पाणी आरक्षित व्हावे : भवर

कोपरगांव : तालुक्याच्या पूर्व भागातील करंजी ते उक्कडगांव दरम्यान पालखेड डाव्या कालव्यावर जनावरांना तसेचपिण्यांच्या पाण्यांसाठी विविध बंधारे असून त्यासाठी खरीप व रब्बी हंगामात पाणी आरक्षित प्रत्येक आर्वतन काळात ते भरून मिळावे, अश मागणी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते केशव भवर आणि पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव निकम यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, पूर्व भागातील दुष्काळी भागात करंजी ते उक्कडगांव दरम्यान विविध पाझर तलाव आहेत. येथे सातत्यांने पिण्याच्या पाण्यांची टंचाई भासते.त्यासाठी शासनाला टॅंकर सुरु करावे लागतात. टॅंकरवर मोठया प्रमाणांत होणारा खर्च वाचण्यासाठी करंजी ते उक्कडगांव दरम्यान असलेल्या बंधा-यात पालखेडचे पाणी आर्वतन काळात ते भरून दिल्यास पाणी टंचाई दूर होते.मात्र यासाठी प्रत्येकवेळेस पालखेड पाटबंधारे कार्यालयाचे अधिकारी व विभागीय आयुक्त नाशिक जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्याकडे मागणी करावी लागते. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण दरवर्षी होण्यास विलंब होतो. त्यामुळे या भागातील जनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होते. त्यासाठी कायमस्वरूपी पालखेडचे पाणी आरक्षित झाले तर त्याचा प्रत्येक आर्वतन काळात त्रास जाणवणार नाही. त्यासाठी आ. स्नेहलता कोल्हे यांनी पाटबंधारे विभागाकडे त्याबाबतचा पाठपुरावा करून निर्णय करावा, असेही केशव भवर म्हणाले.