Breaking News

आजपासून घुगलवडगावचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रोत्सवास प्रारंभ

तालुक्यातील घुगलवडगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रोत्सव आज आणि उद्या रोजी होणार असून गावात यात्रेची जोरदार तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती शिवसेनेचे युवक नेते नाथाभाऊ पवार आणि संरपंच दत्तात्रय दांगडे यांनी दिली.

1 हजार 500 लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावात दोन राजकीय गट असून यात्रेनिमित्ताने दोन लोकनाट्य तमाशा मंङळाचे मनोरंजनासाठी कार्यक्रम आज आणि उद्या राञी आयोजित केले आहेत. तसेच कुस्त्यांचे दोन आखाडे स्वतंत्र आहेत. त्यामुळे या छोट्याशा गावच्या यात्रेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
यात्रेनिमित्त आज सकाळी पहाटे ग्रामदैवताचा अभिषेक केला जातो, तर दिवसभर ज्यांनी नवस केलेले असतात, त्यांचे नवस फेडण्याचा कार्यक्रम होतो. महिला मंडळी दंडवत घालतात. सांयकाळी गाडे ओढण्याचा कार्यक्रम असतो. यासाठी परीसरातील नागरिकांची मोठी गर्दी होते. तर संध्याकाळी लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होत आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी दर्शन दुपारी कुस्त्यांची दंगल व संध्याकाळी परत दुसर्‍या गटाचा लोकनाट्य तमाशा मंङळाच्या कार्यक्रमाने सांगता होते. यासाठी गावातील दिपक दांगडे, संभाजी पाचपुते, देवीदास दांगडे, बापूराव दांगडे, संदिप पवार यांचा सक्रीय सहभाग असतो.