Breaking News

स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्तीसाठी त्रिमूर्तीच्या तेजश्रीची निवड

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत मुंबई कांदिवली येथे दि. 13 ते 16 एप्रिल दरम्यान होणार्‍या स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्तीसाठी त्रिमूर्तीच्या तेजश्री बडगुजरची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे आयोजित दि. 13 ते 16 एप्रिल दरम्यान मुंबई येथे होणार्‍या स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्तीसाठी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठाणच्या दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालयात शिकणारी विद्यार्थिनी तेजश्री सुशानंद बडगुजरची निवड झाली. यापूर्वीही नागपूर येथे पार पडलेल्या वरिष्ठ महिला राज्यस्तरीय कुस्तीसाठी तिची निवड झाली होती. तिला विद्यालयाचे कुस्ती प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच पै. संभाजी शिवाजी निकाळजे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.तेजश्रीच्या या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक साहेबराव घाडगे, अध्यक्षा अ‍ॅड. सुमती घाडगे, उपाध्यक्षा अ‍ॅड. स्नेहल चव्हाण, सचिव मनिष घाडगे, प्राचार्य सोपान काळे, प्राचार्य सचिन कर्डिले, समन्वयक दत्तात्रय वांढेकर, मुख्य क्रीडा विभाग प्रमुख संजय सिंह चौहाणसह सर्व क्रीडा प्रशिक्षक यांनी अभिनंदन केले.