शासकीय आधारभूत दराने हरभरा खरेदी नोंदणी सुरू
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे कर्जत तालुका खरेदी विक्री संघाने गुरुवार दि. 5 एप्रिल पासून शासकीय आधारभूत दराने हरभरा खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू केली आहे. सर्व शेतकरी बांधवांनी हरभरा विक्री करण्यासाठी मिरजगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात जावून ऑनलाईन नोंदणी करावी. त्यासाठी सातबारा 8अ (पिकपेरा नोंदीसह), आधारकार्ड झेरॉक्स व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रतीसह कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन कर्जत तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश चेडे यांनी केले आहे. हरभर्याची आद्रता ही 14 टक्केंपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तशी तपासणी मशीनद्वारे करुन घेण्यात यावी. एकरी 4 क्विंटल हरभरा खरेदी केली जाणार आहे. तरी शेतकर्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
