Breaking News

शाळेचे शुल्क न दिल्याने विद्यार्थी परिक्षेपासून वंचित


करंजी, इंग्रजी माध्यमात शिकणा़र्‍या विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्षातील राहिलेले शुल्क भरले नसल्याने संस्था चालकाने चक्क विद्यार्थ्यांना परिक्षेलाच बसू दिले नाही. त्यामुळे करंजी येथील विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे करंजी (ता.पाथर्डी) येथीलनवनाथ एकनाथ क्षेत्रे या पालकांनी सबंधित संस्थेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असून वेळप्रसंगी अांदोलन उभारणारअसल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. त्या शाळांत आपल्यापाल्यालाही शिकावे अशी सामान्य कुटूंबातील पालकांची इच्छा असते. मात्रत्याचा संस्थाचालक चांगलाच फायदा घेत असून सक्तीने शुल्क वसुल करतात.सध्या सर्वच माध्यमाच्या परिक्षा सुरु आहेत. करंजी (ता. पाथर्डी) येथील विद्यार्थी तिसगाव येथील पार्थ इंग्रजी शाळेत जातात. सध्या येथे ही परिक्षा सुरु आहेत. माझी मुलगी या शाळेत चार वर्षापासून शिकत असून सध्याआठवीत आहे. आतापर्यत माझ्याकडे शाळेची फिस थकीत नाही. मात्र या वर्षीची साधारण दहा टक्के शुल्क देणे बाकी आहे. त्यामुळे संस्था चालकांनी माझ्या मुलीला परिक्षेला बसू दिले नाही. संस्थेचे पदाधिकारी शुल्क राहिलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात फिरून पैसे दिले नाही म्हणून परिक्षेला बसू दिले नाही असे सांगून अपमानीत करतात. राहिलेले पैसे अम्ही देणारच आहोत, मात्रबालकाच्या मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार कोणत्याही विद्यार्थ्यांला शिक्षणापासून आणि परिक्षेपासून वंचित ठेवता येत नाही. असे असताना माझ्यामुलीला केवळ संस्थाचालकांच्या मनमानीमुळे परिक्षेपासून वंचित रहावे लागले आहे. यामुळे तिला मानसिक धक्का बसला आहे. अशाच पद्धतीने अनेक विद्यार्थ्यी परिक्षेपासून वंचित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणा़र्‍यापार्थ संस्थाचालकावर कारवाई करावी अशी आपली मागणी आहे. जर जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाने दखल घेतली नाही तर अांदोलन करुन वरिष्ठाकडेदाद मागणार असल्याचे क्षेत्र यांनी सांगितले.