Breaking News

हत्या प्रकरणात दाऊदच्या साथीदाराला अटक


वीस वर्षांपूर्वीच्या एका हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा साथीदार परवीन याला जीटी रुग्णालयाजवळून अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी दिली. शर्मा म्हणाले, वीस वर्षांपूर्वी परवीन याने केबल ऑपरेटर मोहंंमद बांगडीवाला याची हत्या केली होती. चौकशीत त्याने हत्येची कबुलीही दिली आहे. बांगडीवाला याचा मोठा केबल व्यवसाय होता.