Breaking News

राज्यात बिहारपेक्षा वाईट परिस्थिती हत्याकांडातील हत्यारे व सूत्रधारांना फाशी द्या : उध्दव ठाकरे

अहमदनगर : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट असल्याची टीका करत, राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेने सुरुवातीपासून केली आहे असे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले. 

केडगावमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील हत्यारे व सूत्रधार अशा सर्वाच्या विरूध्द कठोर कारवाई करून आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी. या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जावा. राज्यातील सरकार निकम्मा असल्यानेच अशा घटना होत आहेत. त्यामुळे राज्याला तातडीने स्वतंत्र पूर्णवेळ गृहमंत्री नेमण्याची गरज आहे, अशा मागण्या उध्दव ठाकरे यांनी केल्या आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केडगाव येथील हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी उध्दव ठाकरे यांनी आर्थिक मदतही जाहीर केली. शिवसेनेकडून कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाख 50 हजाराची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.शिवसैनिकांवर पाठीमागून हल्ले करणारे नामर्दाची अवलाद असून, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन वार करावा. अशा गुन्हेगारांना पाठी घातले जात असेल तर शिवसेनेला कायदा हातात घ्यायचा विचार करावा लागेल असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही तर अशा नामर्दाच्या अवलादींना शिवसेना आपल्या पद्धतीने ठेचून काढेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या दोन शिवसैनिकांच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अधिकार वापरावा आणि आरोपींना फासावर चढवावे. मग आरोपी कोणत्याही पक्षाचे असो त्यांना शासन झालेच पाहिजे, छ. शिवाजी महाराजांचे नाव घेवून राज्यकारभार चालवणार असाल तर गुन्हेगारांना शिक्षा करा, अन्यथा शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नका असेही उध्दव ठाकरे म्हणाले.
राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट असल्याची टिका उध्दव ठाकरे यांनी करून मुख्यमंत्र्यांना लक्ष केले. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असवा अशी शिवसेनेची पहिल्या पासूनच मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसैनिकांच्या हत्ये प्रकरणी सरकारची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांना विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे ही केस सोपवली गेली पाहिजे. आम्हाला कायदा हातात घेऊन प्रतिकार करण्याची वेळ आली तर तो करावा लागेलच, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.