Breaking News

स्वदेशी बनावटीच्या तेजसची लक्षवेधक कामगिरी


नवी दिल्ली - भारतीय वायु सेनेने आपल्या सर्वात मोठया 14 दिवसीय युद्धकार्य सराव गगन शक्ती 2018 दरम्यान स्वदेशी बनावटीचे लाईट कॉम्बॅट विमान (एलसीए) तेजसची चाचणी केली. भारतीय बनावटीच्या या विमानाने या सरावादरम्यान उत्तम कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय वायू सेनेचा एक अधिकाऱी म्हणाला, आम्ही एलसीए तेजसच्या कार्यक्षमतेची तपासणी केली. आम्ही दर दिवशी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सहा सोर्टीज निर्माण करतो. मात्र या सरावासाठी आम्ही आठ प्लॅटफॉर्मस उभारले होते. 8 एप्रिलला सुरू झालेल्या भीरतीय वायू सेनेच्या या सरावची 20 एप्रिलला सांगता झाली. पहिल्याच दिवशीच सहा विमानामध्ये काही बिघाड आढळून आले, मात्र त्याची दुरूस्ती तातडीने क रण्यात आली. एलसीए तेजसने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे अधिकार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता त्यांना फक्त चिंता आहे ती म्हणजे या विमानाच्या अतिशय संथ ग तिने होणार्‍या उत्पादन प्रक्रियेची.