Breaking News

शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल सरोदे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत


शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल सरोदे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. वाढदिवस सगळे साजरे करतात, पण हा वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करून साजरा करण्यात आला, शेवगाव येथील आनंद निवास मधील अनाथ मुलांना नविन कपड्यांचे वाटप यानिमित्ताने करण्यात आले.

यावेळी आनंद निवासचे धर्मगुरू व सिस्टर हिलदा व सिस्टर बीटी व अजिंक्य लांडे, इम्रान शेख, लाला शेठ धुत, अनिल शेठ धुत इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर विलक्षण आनंद पहावयास मिळाला.