Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची नेवासा शहरात जय्यत तयारी - संजय सुखधान


नेवासा, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेवासा शहरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार असून त्यादृष्टीने जय्यत तयारी सुरू असून मिरवणूक मार्गावरील रस्त्यांवर विद्युत रोषणाई सह स्वागत कमानी ही उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय सुखधान यांनी दिली.

शनिवार दि.14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सकाळी 10 वाजता पंचायत समितीच्या गेट जवळ उभारण्यात येणार्‍या मंडपामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सर्वधर्मीयांच्या वतीने अभिवादन करण्यात येईल सायंकाळी 4 वाजता एस.टी.स्टँड पासून मिरवणुकीस प्रारंभ होणार असून मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक जाईल रात्री 10 वाजता मिरवणुकीचा समारोप एस.टी. प्रांगणात झाल्यानंतर मनोगताद्वारे अभिवादन सभा होणार आहे. 

रविवार दि.15 एप्रिल रोजी नगरपंचायत चौकामध्ये सायंकाळी 7 वाजता श्रीरामपूर येथील गायक सुनील शिरसाठ यांचा भीमगीते व शिवगीतांचा कार्यक्रम होणार असून नंतर तेथून पुढे गावोगावी जयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात येईल असे नियोजन करण्यात आले असून तालुक्याच्या वतीने नेवासा शहरात साजर्‍या होणार्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणार्‍या कार्यक्रमास सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सवाची शान वाढवावी असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष संजय सुखधान यांनी केले आहे.