पैठण शहरात देशी दारू जप्त
पैठण : पोलिसांनी केली धडाकेबाज कारवाई करीत तहसील कार्यालयामागे असलेल्या एका वस्तीतील झाडा झूडपात लपवून ठेवण्यात आलेला बेकायदा दारूसाठा जप्त केला. रात्रीची गस्त {पेट्रोलिंग} सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहिती वरून पोलिसांनी टाकली घटनास्थळी धाड. या कारवाईत पैठण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक विलास दूसिंगे, पो. हवालदार सिराज पठाण, राहूल बचके, पो ना. विक्की जाधव, दिलीप औताडे , विठ्ठल येडके, थेटे, सोनवणे व गोपनीय शाखेचे गणेश शर्मा यांचा समावेश होता. या प्रकरणी फरार आरोपी विरूद्ध पोलीस ठाण्यात मुंबई दारू बंदी कायदा 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धाडसञा मूळे लपूनछपून बेकायदा दारू विक्री करणार्यांचे धाबे दणादणले आहे.