Breaking News

युपीएससीतील अव्वल अनुदीप दुरीशेट्टीने उलगडली यशोगाथा

हैदराबाद : केंद्रीय लोकसेवा आयोग 2017 परीक्षेत देशभरातून पहिला क्रमांक मिळवणार्‍या अनदीप दुरीशेट्टीचे सगळीकडे कौतुक होत आहे. ही परीक्षा पास करण्याचा आपला प्रवास फार सोपा नव्हता, असे अनुदीपने सांगितले. हा माझा पाचवा प्रयत्न होता. यापूर्वी मी तीनदा नापास झालो. हा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता. किंबहुना आता आपल्या यशावरून मी खूप खूश आहे. बर्‍यावाईट काळात पाठीशी उभे राहणार्‍या सगळ्यांविषयी मी कृतज्ञ आहे, असे अनुदीपने सांगितले. भारतीय कर सेवा अ धिकारी पदावर दोन वर्षे काम करणार्‍या 28 वर्षीय अनुदीप यूपीएससीत देशात पहिला आला आहे. सोनीपत येथील अनू कुमारीने दुसरे तर सचिन गुप्ताने या परीक्षेत तिसरे स्थान मिळवले आहे. 


स्त्रियांचे संरक्षण याला आपण प्रथम प्राधान्य देऊ, अशी प्रतिक्रिया दुसरा क्रमांक पटक ावणार्‍या अनू कुमारीने दिली. आपल्याला आयएएस ऑफिसर बनून देशात राहूनच सेवा द्यायची आहे. देशातील सर्व महिलांना सुरक्षित वाटावे, अशी आपली इच्छा असल्याचेही अनू कुमारीने सांगितले. यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेला 9 लाख 57 हजार 590 परीक्षार्थींनी अर्ज केला होता. यापैकी 4 लाख 56 हजार 625 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण 13 हजार 366 विद्यार्थी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. यामध्ये 2568 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व फेब्रुवारी ते ए प्रिल महिन्यात झालेल्या व्यक्तिमत्व चाचणीसाठी त्यांची निवड झाली होती.