सर्वात महागडी अक्षय्य तृतीया
गेल्या काही वर्षात अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव 30 हजार रुपये प्रति तोळा (10 ग्रॅम)च्या वर कधी गेला नाही. गेल्या वर्षी 9 मे रोजी अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भावा 29, 860 रुपये होता. 2018च्या सुरुवातीला सोन्याचा भाव प्रति तोळा (10 ग्रॅम) 28, 500 रुपये होता. सोन्याचा भाव फक्त भारतात वाढलेला नाही. तर जगभरात सोन्याचा भाव वाढला आहे. न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. तसेच चांदीचाही भाव वाढला.