Breaking News

अ‍ॅक्सिस बँकेच्या सीईओ शिखा शर्मा होणार पायउतार !

मुंबई, दि. 11, एप्रिल - आर्थिक क्षेत्रात दीर्घकाळ सीईओपद सांभाळणार्‍या शिखा शर्मा यांनी ’अ‍ॅक्सिस बँके’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकाळ संपण्यापूर्वीच शिखा यांनी निर्णय घेतल्याने बँकिंग वर्तृळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. शिखा यांची पुर्ननियुक्ती करण्याच्या  ’अ‍ॅक्सिस बँके’चा प्रस्तावावर ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. शिखा यांचा कार्यकाळ संपण्यासाठी अजून अडीच वर्षांचा अवधी शिल्लक आहे. त्यापूर्वीच डिसेंबर 2018 मध्ये त्यांनी आपल्या पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.