Breaking News

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या छाप्यात लाखोंचा गुटखा जप्त

गुटखा पुरवठादार विकेता साखळी तोडण्याची अपेक्षा

नाशिक, दि. 11, एप्रिल -शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात लाखो रूपयांचा गुटखा  ताब्यात घेतल्याने बंदी असलेला गुटखा शहरात विक्री होत असल्याची माहीती खरी ठरली आहे.दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या या कारवाईतून गुटख्याची अवैध विक्री आणि त्याचा पुरवठा करणारी साखळी शोधून उध्वस्त केली जाईल अशी रास्त अपेक्षा नाशिककर व्यक्त करीत आहेत.
दिंडोरी रोडवरील आकाश पेट्रोल पंपाजवळ खुशबू ट्रेडर्स या दुकानात एक इसम प्रतिबंधित गुटखा व परदेशी सिगारेटचा साठा करून विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. सदर माहिती त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. विजय मगर यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः  सदर ठिकाणी जाऊन तपासणी केली असता खुशबू ट्रेडर्स या ठिकाणी विजय भागचंद बाफना नावाचा इसम अवैध गुटखा व सिगारेट चा साठा करून विक्री करताना सापडला. त्या वेळी नखाते यांनी म्हसरूळचेपोलीस निरीक्षक सुभाष देशमुख यांना कर्मचार्यांसह बोलावून घेतले तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या श्री. विवेक पाटील यांनाही पाचारण केले.  संपूर्ण मालाचा पंचनामा करून पुढील कारवाई साठी माल ताब्यात घेतला. सदर कारवाईदरम्यान विमल, हिरा, रॉयल, वाह, राजनिवास, ठचऊ, सिमला, मिराज या विविध कंपन्यांचा 1,92,245 रु. चा गुटखा पानमसाला व शूटर, मॅक्सवंड, गुडंगरम, ब्लॅक, रुईली रिव्हर या कंपनीचे पाकीटावर संवैधानिक इशारा नसलेले रू. 17,795 चे सिगारेट मिळून आले. सिगारेट पोलीसांनी जप्त करुन त्यावर कोटपा (उळसरीशीींंश रपव ेींहशी ीेंलरलले िीेर्वीलीीं रलीं 2003) कायद्याप्रमाणे म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या सोबत महाजन, बोडखे, निगळ, भदाने हे कर्मचारी सहभागी झाले. सदर दुकान व वरच्या मजल्यावर असलेले गोडाऊन सील करण्यात आले आहे.