Breaking News

पंतप्रधान सहज वीज प्रत्येक घर योजनेच्या प्रचारासाठी कोट्यवधी खर्च

पंतप्रधान सहज वीज प्रत्येक घर योजनेचे (सौभाग्य) काम आतापर्यंत जेमतेम १५ टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र त्याच्या प्रचारावर देशभरात १९२३ होर्डिंग्ज लावण्याचे आदेश निघाले. पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत रस्त्यांवर हे होर्डिंग्ज झगमगणार आहेत. सौभाग्य योजनेची गत वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरूवात करण्यात आली होती. त्यानुसार देशात ३.६८ कोटी घरांत मार्च २०१९ पर्यंत वीज पुरवठा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. परंतु ऑक्टोबरपर्यंत केवळ ४८.५ लाख घरांपर्यंत बल्बचा पुरवठ्याचे काम पूर्ण झाले होते, अशी माहिती वीज मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.सार्वजनिक क्षेत्रातील सर्व कंपन्यांना देशभरात सौभाग्यच्या होर्डिंग्ज लावण्याची जबाबदार सोपवण्यात आली आहे.