Breaking News

तेजस्विनी सावंतची वर्ल्डकपमध्ये निराशा


गाेल्डकाेस्ट राष्ट्रकुलची चॅम्पियन तेजस्विनी सावंतचा अायएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या फायनलमधील प्रवेशाचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे तिला पात्रता फेरीत १२ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पाेझिशन गटाची फायनल गाठण्यासाठी कसून प्रयत्न केला. मात्र, तिला समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. तिने पात्रता फेरीमध्ये ११६७ गुण संपादन केले. या गटात युक्रेनची एना इलाना ११६८ गुणांसह अाठव्या स्थानावर राहिली. गायत्रीलाही निराशेला सामाेरे जावे लागले. या गटात तिने ११५६ गुणांसह ४४ व्या स्थानावर धडक मारली. अंजुम मुदगिलने ४६ वे स्थान गाठले.