Breaking News

दूध उत्पादकांच्या विश्‍वासावर प्रभातची गगन भरारी : किशोर निर्मळ


श्रीरामपुर ता. प्रतिनिधी : सुरुवातीला परिसरातील दूध उत्पादकांनी प्रभात दूध वर जो विश्‍वास टाकला व दूध पुरवठा केला त्याच विश्‍वासावर आजवर प्रभात उदयोग समूहाने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उत्कृष्ठ उत्पादने वितरित करुण ग्राहकांचा विश्‍वास संपादन करुण प्रभात उद्योग समूहाने गगन भरारी घेतली असे प्रतिपादन प्रभात उदयोग समूहाचे संचालक किशोर निर्मळ यांनी केले. राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकड़ी येथे प्रभात महाविस्तार केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होत.े या महाविस्तार केंद्राचे उद्धघाटन रामनाथबाबा कोते यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश लहारे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून प्रभातचे संचालक किशोर निर्मळ होते . वाकड़ी येथील प्रभात महाविस्तार केंद्राच्या उद्धघाटन कार्यक्रम दरम्यान आयोजित गो पालक मेळाव्यात संचालक किशोर निर्मळ यांनी उपस्थित दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूध वाढ, जनावरांची आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी, जनवारांचा आहार, चारा पाणी तसेच दूध गुणप्रत याविषयी महत्वाचे मार्गदर्शन केले. प्रभातचे असिस्टंट मॅनेजर रवि शेवाळे यांनी देखील दुधाची गुणप्रत , दर्जा व जनावरांची घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले. वाकड़ी येथील प्रभात महाविस्तार केंद्र निर्मिति साठी येथील डॉ. नीलेश कोते, व आण्णासाहेब कोते यांनी जागा उपलब्ध करुण व बांधकाम खर्च केला. तर प्रभात कडून अद्यवयत मशीनरिची व्यवस्था केलि यावेळी युवा नेते आशुतोष काळे यांनी शुभेच्छा दिल्या. तर माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहारे, अनिल कोते, प्रभाकर एलम यांच भाषणे झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कविता लहारे, पं. स. सदस्य अर्चना आहेर, संदीप लहारे , बापू लहारे, नारायण शेळके, अनिल शेळके संदीपानंद लहारे , हरिभाऊ लहारे , बाबासाहेब शेळके, के आर जाधव, विलास कोते , डॉ. नीलेश कोते ,विष्णु कोते, नीलेश कोते , मनोज कोते नीलेश धनवटे , राजेंद्र लहारे , डॉ विजय कोते ,राहुल कोते, राजेंद्र कोते, साई यश ट्रेडर्सचे कर्मचारी आदींसह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रभातचे अविनाश साळुंखे यांनी केले तर आभार आण्णासाहेब कोते यांनी मानले.