Breaking News

प्रा. किर्ती बंग यांना पुरस्कार.

सोनई प्रतिनिधी - सोनई शनिशिंगणापूर रस्त्यालगत असलेल्या किड्स किंग्डम इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रा.किर्ती सचिन बंग यांनी महिला उद्योजक क्षेत्रात मानाचा ठसा उमठवल्याबद्दल पुणे येथील महेश इंडस्ट्रियल ग्रुप च्या वतीने राज्यस्तरिय महिला उद्योजिका पुरस्कार कार्यकारी संचालक ओम प्रकाश चितलांगे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. पुण्याच्या डॉ. शामराव कलमाडी विद्यालयाच्या समारंभाच्या वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलेश खटोड हे होते. यावेळी श्याम भुतडा, नितीन मंत्री व किशोर तोष्णीवाल यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास महेश ग्रुप चे अध्यक्ष राहुल धूत, सचिन मालपाणी, मनोज झंवर आदी उपस्थित होते. यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.