पनवेल ते इंदापूर टप्पा चौपदरीकरणाच्या कामांना गती देण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
पनवेल ते इंदापूर टप्प्याच्या चौपदरीकरण कामाबाबत आणि कोल्हापूर येथील बाह्यवळण रस्त्याच्या आखणीसंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी श्री. पाटील यांनी कामांचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कामांसंदर्भात निर्देश दिले. या बैठकीस उपजिल्हाधिकारी ए. आर. हडगल, सचिव के. टी. पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक सदस्य श्री. तावडे, प्रादेशिक अधिकारी राजू सिंग, प्रकल्प संचालक प्रशांत हेगडे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर येथील बाह्यवळण मार्गाच्या आराखड्यात स्थानिकांच्या मागणीनुसार बदल करण्यात आल्याने, या मार्गात जाणारी स्थानिकांची घरे आता सुरक्षित राहणार आहेत. याचबरोबर स्थानिकांच्या मागणीनुसार शेतामधून रस्ता न नेता वळण घेण्यात आले आहे. या संदर्भातील बदलाची माहिती संबंधित स्थानिक प्रतिनिधींना द्यावी आणि पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.