Breaking News

देशाच्या प्रगतीसाठी सर्व समाज एकसंध ठेवण्याची गरज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सोलापूर : भारतावर अनेक आक्रमणे होऊनही प्राचीन परंपरांमुळेच भारताची संस्कृती टिकून आहे. देशातील विविध मठ संस्कार व शिक्षण प्रसार करण्याची ठिकाणे आहेत, देशातील सर्व समाज एकसंघ ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

येथील अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी मंदिरात श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या श्री संकल्पसिद्धी कार्यमहोत्सव २०१८ अंतर्गत वीरशैव लिंगायत संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख,जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सिद्धराम म्हेत्रे, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, श्री श्री श्री १००८ उज्जयनी जगद्गुरू, श्री श्री श्री १००८ श्रीशैल जगद्गुरू, श्री श्री श्री १००८ काशी जगद्गुरू उपस्थित होते.