Breaking News

विखे पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना नोकरी

प्रवरानगर  - पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकमध्ये झालेल्या परिसर मुलाखतीमध्ये ७० विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. जानेवारी ते मार्च या महिन्यात पाच नामांकित कपन्यांनी लोणी येथे परिसर मुलाखती घेतल्याचे प्राचार्य प्रा. मनोज परजणे यांनी सांगितले. 

विखे पॉलिटेक्निक तर्फे जानेवारी ते मार्च या महिन्यात हार्मन फिनोकेम लि. औरंगाबाद, टेक्नोफेअर सोल्युशन्स अंबड, मॅग्नेटी मरेली मदरसन शॉकअप इंडिया लि. पुणे, बजाज, पुणे, एव्हर इलेक्ट्रॉनिक्स कोरेगांव, होगनस इंडिया प्रा. लि. अहमदनगर या नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्याच्यावतीने लोणी येथे परिसर मुलाखती घेण्यात आल्या. एव्हर इलेक्ट्रॉनिक्स कोरेगांव या कंपनीतर्फे सोळा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे नेतृत्वामुळे परिसर मुलाखतींसाठी बहुराष्ट्रीय कंपन्याचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुलाखतीकरीता प्रशिक्षण विभागाचे प्रा.राजेंद्र निंबाळकर परिश्रम घेत आहेत.