Breaking News

पत्रकार बेंडाळे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध

राहाता प्रतिनिधी - अहमदनगर येथे झालेल्या हत्याकांडाच्या वार्तांकनासाठी घटनास्थळी गेलेले पत्रकार मिलिंद बेंडाळे यांना झालेल्या मारहाणीचा राहाता प्रेस क्लब व तालुक्यातील पत्रकारांनी निषेध नोंदविला.

या घटनेच्या निषेधार्थ राहाता- शिर्डी शहर व तालुक्यातील पत्रकारांनी तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, मिलिंद बेंडाळे हे अहमदनगर येथील हत्याकांडाच्या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी गेले असता जमावाने त्यांच्यावर कुठलेही कारण नसताना हल्ला चढविला. लोकशाहीला काळिमा फासणारी ही घटना आहे. पत्रकारीतेचा गळा घोटणारी आहे. या घटनेस जबाबदार असलणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब राऊत यांनी मनोगतात घटनेचा निषेध व्यक्त केला. या निवेदनावर विविध वर्तमानपत्रांच्या २८ पत्रकारांच्या सह्या आहेत