Breaking News

चांदा जि.प.शाळेत इ.4 थी च्या विद्यार्थ्यांना निरोप


चांदा(प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील चांदा येथील जि.प.केंद्र शाळेच्या इ.4थी.च्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला . या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते शामराव पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण जावळे हे होते.या वेळी मुलींनी आलेल्या पाहुन्यांचे स्वागत स्वागतगीताने केले . तसेचहिंदी,इंग्रजी भाषेत उपस्थितांना शाळेची माहिती दिली.इ.4थी च्या मुलींनी चांगले गुण कौशल्य भाषनाणे केले . तसेच अध्यक्ष भाषणात शामराव पवार यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास शुभेच्छ्यादिवून मार्गदर्शन केले. किरण जावळे यांनी विद्यर्थ्याना मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक आर.पी.इंगळे ,काटकर,गोंटे,सौ.वर्षा शिंदे या शिक्षिकांनी पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व शुभेच्छ्या दिल्या.शहाजी धुमाळ ,बंडू दहातोंडे ,भाऊराव शिंदे ,भाऊसाहेब चिंतामणी ,भाऊसाहेब पुंड व आदी पालक उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काटकर.गोंटे,सौ.वंदना शहाने ,सौ.ज्ञानेश्‍वरी दळवी ,सौ.रुपाली खेडकर सौ.अनिता जाधव ,सौ.वर्षा शिंदे , सौ.उषा मोरे या शिक्षिकांनी परिश्रम घेतले.