Breaking News

वीर जवान कुटेंचा पुतळा सुपा पोलीसांकडून ग्रामस्थांच्या ताब्यात, उद्या पुतळा दुरुस्तीसाठी पाठवणार

पारनेर पोलीसांकडून सुपा पोलीसांकडे वीर जवाण अरुन कुटे यांचा पुतळा वर्ग झाल्यानंतर कायदेशीर कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर काल सकाळी 11 वाजता सुपा पोलीसांकडून कुटे परिवारासह वडनेर ग्रामस्थांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सुपा पोलीस स्टेशनचे ठाणे अमलदार वनाजी धामणे, हे.कॉ. भाऊसाहेब अकोलकर, वाडेगव्हाण सरपंच तथा नितीन शेळके, वडनेर हवेलीचे उपसरपंच प्रकाश वाळूंज, माजी उपसरपंच राजूशेठ सोनुळे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष विष्णूपंत वाळूंज, गंगाराम कोंडीबा सोनुळे, विकास गाडे, वीरपिता बबन कुटे, वीरमाता शांताबाई कुटे, माधव पवार, सुभाष बढे, राजेंद्र गाडे, वसंत गाडे, आबा सोनुळे, किशोर यादव, सोमनाथ वाखारे, योगेश शिंदे, राहूल सोनूळे, संजय बढे, मनोहर वाबळे, प्रमोद गाडे, आबाजी सोनुळे आदी उपस्थित होते.आजरोजी पुणे येथे पुतळा दुरुस्तीसाठी पाठवण्यात येणार असून त्यासाठी वाडेगव्हाणचे सरपंच नितिन शेळके यांनी 5 हजार एक, गंगाराम सोनुळे यांनी 5 हजार एक, विकास गाडे यांनी 3 हजार तिनशे, विष्णूपंत वाळूंज यांनी 2 हजार एक, राजेंद्र गाडे यांनी 2 हजार एक, वसंत गाडे यांनी 2 हजार एक रोख स्वरुपात रक्कम कुटे कुटुंबाकडे जमा केले.
दरम्यान पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथे सैन्य दलातील शहीद जवान अरुण बबन कुटे (वय 22) यांनी पुंछ राजोरी (जम्मु काश्मीर) याठिकाणी अतिरेकी हल्यात 3 अतिरेक्यांचा खात्मा करुन स्वत: देशासाठी बलिदान दिले. त्यांची आठवन म्हणून कुटे परिवार व वडनेर हवेली ग्रामस्थांच्या वतीने वडनेर हवेली फाटयावर शहीद स्मारकामध्ये 60 किलो ब्रांझ, पंचधातुचा पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा एक वर्षापूर्वी काही समाजकंटकांनी चोरुन नेला याबाबत सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. मात्र 6 महिन्याचा कालावधी होऊनही पुतळ्याचा तपास लागत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, माहीती सेवा समिती तालुका अध्यक्ष शरद रसाळ यांनी पोलिस स्टेशनला आंदोलनाचा इशारा देवून रविवार दि. 12 नोव्हेंबर 2017 रोजी वडनेर हवेली ग्रामस्थांसह शहिद अरुण कुटे परिवाराने शहीद स्मारकामध्ये मौन, आत्मक्लेश धरले आंदोलन केले. तत्कालिन सुपा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक बशारथखाण पठाण, चालक भाऊ शिंदे यांसह पोलिस कर्मचारी, समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रसाद लंके, भुमिपुत्रचे सचिन शेळके, संतोष रांजणे, सुभेदार बबन गायकवाड, ज्ञानदेव कांडेकर, मानवाधिकारचे अविनाश ढोरमले, सुहास शेळके, सरपंच राजीव सोनुळे, बबन कुटे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मौन सुटल्यानंतर अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी तपास चालू असल्याचे सांगितले व लकरच गुन्हेगारांना पकडण्याचे आश्‍वासन दिले होते.
गुरुवारी पारनेर पोलिसस्टेशनला गुप्त बातमीदारामार्फत पुतळ्याची माहिती मिळाल्यानंतर लगेच रात्री पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे, राजेंद्र पवार, मोहम्मद मेख पोलिस मित्र बाळासाहेब हिलाल, जिमगावचे सुनिल कावरे, सोमनाथ सोबले यांनी पुतळा लोणी हवेली-जामगाव रस्त्याच्या बाजुच्या खड्ड्यातुन बाहेर काढुन पारनेर पोलिस ठाण्यात आणला. 
पुतळा कुटे परिवाराच्या ताब्यात मिळाला असून, दुरुस्ती करुन लवकरच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या हस्ते बसविण्यात येणार असल्याचे वीरपिता बबन कुटे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.