Breaking News

खर्डा येथे उज्ज्वला योजनेचे लोकार्पन


येथील सिद्धी विनायक गॅस मार्फत एलपीजी पंचायत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पं. स. सदस्य मनिषा सुरवसे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्या वंदना लोखंडे या होत्या. तसेच खर्डा ग्रामपंचायत सरपंच संजय गोपाळघरे, अनिल लोखंडे, वैजिनाथ पाटील, सरपंच शिवकुमार गुळवे, माजी उपसरपंच भागवत सूरवसे, अजाज जिक्रे उपस्थितीत होते. उज्ज्वला योजनेतील लाभार्थींना यावेळी गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. उज्ज्वला योजनाविषयी मार्गदर्शन व या योजना सुरु करण्यात आली याविषयी माहिती कोरे यांनी सांगितली. तसेच गॅस वापरताना घ्यावयाची काळजी यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोरे सर यांनी तर, आभार आंधळकर यांनी मानले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.