Breaking News

आंबेडकर तालुक्यात जयंती उत्साहात

संगमनेर ( प्रतिनिधी ) कर्मकांड व बुरसटलेल्या विचारसरणीतून बहुजन समाजाला बाहेर काढणारा समतेचा पुरोगामी विचार सत्यात उतरवणारे महामानव विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगाला शोषणाविरुध्द क्रांतीचे विचार देणारे मानवरत्न असल्याचे गौरवौद्गार काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अभिवादन सभा व समाज प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्यााप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर आ.डॉ.सुधीर तांबे,नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार,अध्यक्ष बी.आर.कदम,येष्ठ नेते सुधाकरराव रोहम, प्रा.शशिकांत माघाडे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी अब्दुला चौधरी व निलीमा घाडगे यांना समाज प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी आमदार थोरात म्हणाले कि, कर्मकांड व होमहवना विरुध्द भगवान बुध्दांनी जगात पहिली क्रांती केली. हाच वारसा संत -ाानेश्‍वरांनी पुढे चालवला.गीतेला संस्कृत भाषेतून प्राकृत्त भाषेत आणले.संत तुकाराम,नामदेव चोखा मेळा, संत रोहिदास,संत कबीर यासह सर्व संतांनी या पुरोगामी विचारांचा प्रचार प्रसार केला.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा योतिबा फुले,राजर्षी शाहु महाराज यांनी हा विचार प्रत्यक्षात आणला.तर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या विचाराने भारताबरोबर जगाला समतेचा मंत्र दिला.पुरोगामी परंपरेचा प्रत्यक्ष स्वरुप त्यांनी दिले.भारतीय रायघटनेने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य,समता व मतदानाचा हक्क दिला.जगात अनेक प्रगत राष्ट्रे आहेत. लोकशाही देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विकासाचा विचार मोडण्याचा काही छुप्या शक्ती काम करत आहेत.अशा कुटील निती अगदी अनादी काळापासून कार्यरत होत्या.आजही आहेत.समाजात बुध्दीभेद करुन तेढ निर्माण करु पाहत आहेत.जातीच्या नावावर युवकांना भडकवत आहेत.अशांपासून सावध रहा अशा प्रवृत्तींचा बिमोड केला पाहिजे.तरच सशक्त व बलशाली भारत उभा राहिल. जगात अन्याय विरुध्द लढण्यासाठी प्रेरणास्त्रोत ठरलेल्या डॉ.आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

यावेळी आ.डॉ.तांबे म्हणाले कि, महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा आहे.तळागाळांतील माणसांच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सर्वजण कटीबध्द आहोत. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज,छत्रपती शिवाजी महाराज या थोर महापुरुषांनी केलेला त्याग, दिलेली समतेची शिकवण या पध्दतीने जीवन जगले तर खर्‍या अर्थाने आनंदी जीवन जगता येईल.सध्या पुरोगामी विचार मोडून टाकण्यासाठी काही शक्ती काम करत आहेत. त्यांनी अंतर्गत मनापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंमलात आणावे.सर्व भेदभाव नष्ट होईल.मात्र या काही दुटप्पी शक्ती विरुध्द संघटीत होवून आपण लढले पाहिजे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करावे असे ही ते म्हणाले.

याप्रसंगी सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, संगमनेर तालुका हा पुरोगामी विचार जोपासणारा तालुका आहे. येथे सर्वजण गुण्यागोविंदाने राहत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व राष्ट्रपुरुषांच्या समतेचा व विकासाचा विचार घेवून येथे काम सुरु आहे.हाच विचार जोपासण्यासाठी युवकांनी काम करावे असे ही त्या म्हणाल्या.

याप्रसंगी के.एस.गायकवाड,विलास दारोळे,ए.बी.बनसोडे,रामनाथ जगताप,अण्णासाहेब अडांगळे,कुसुमताई माघाडे,दत्तु गायकवाड,बाळासाहेब बागुल,बाळासाहेब नवले आदिंसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शशिकांत माघाडे यांनी केले.सुत्रसंचालन गौतम गायकवाड यांनी केले तर विलासराव अडांगळे आभार मानले.यावेळी युवक, नागरिक, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.