सिनेअभिनेता संतोष आणि सातपुतेंच्या रॅलीस प्रतिसाद
संगमनेर ( प्रतिनिधी ) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याजयंतीनिमित्त मराठी चित्रपट अभिनेता संतोष जुवेकर, कमलाकर सातपुते, आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, सुधाकर रोहम आदींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोटार सायकल रॅलीला युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या रॅलीत ५०० युवकांचा उत्स्फुर्त सहभाग होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने संगमनेर दुमदुमले. मराठी चित्रपट अभिनेत्यांना पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी होती.
याप्रसंगी अभिनेता संतोष जुवेकर म्हणाले, जगाला समता व बंधुतेची शिकवण देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहाने होते आहे, हे खूप आनंददायी आहे. आ. बाळासाहेब थोरात म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेची शिकवण देणारे राष्ट्रपुरुष होते. त्यांचा विचार जगाला मार्गदर्शक ठरणारा असून युवकांनी शिक्षणातून समाजासाठी काम करावे. राष्ट्रपुरुषांच्या विचारांचे अनुरण करावे.
या रॅलीच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष सुधाकर रोहम, सचिव प्रविण गायकवाड, राजू खरात, मंजाबापू साळवे, सुनिल रुपवते, दीपक अभंग, शुभम रोकडे, रावसाहेब जगताप, चेतन दारोळे, निलेश बागुल , विजय पांढरे, प्रकाश वाघमारे आदिंसह विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.