Breaking News

जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चा ची बैठक संपन्न


अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या अहमदनगर येथील कार्यालयात भाजपा ओबीसी मोर्चाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आल्या, या मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले.

6 एप्रिल रोजी होणार्‍या पक्षाच्या मुंबई येथे होणार्‍या मेळाव्याच्या संदर्भात विचार विनिमयासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती,या बैठकीसाठी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दत्ता हिरणवळेे उपस्थित होते, जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब गोपाळ तसेच जिल्हा सरचिटणीस गंगा उर्फ शिवाजी खेडकर इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.