‘साई एम्प्लॉइज’च्या पगारवाढीसाठी पाठपुरावा : पवार
साईभक्तांना मोबाईल लॉकर, पेढा, प्रसाद, चप्पल स्टॅंड आदींसह विविध सुविधा माफक दरात देणारी संस्था म्हणून ओळखली जाते. कागदपत्रांची पूर्तता होताच एका दिवसात पगाराच्या पटीत ही संस्था कर्ज वितरण करते. या संस्थेला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. या सोसायटीकडे कायम कामगार ८५ कामगार असून त्यातील २० कामगार २० हजारांच्या पुढे पगार घेणारे आहेत. ६५ कामगार १० हजाराच्या आसपास पगार घेतात. तर कंत्राटी १०० कामगारांना ७ हजाराच्या आसपास पगार दिला जातो. मात्र पगाराचा प्रश्न गेल्या
अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या कामगारांना अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही, ही भावना त्यांच्या व कौटुंबिक जीवनात अडचणीची ठरत होती. या कामगारांकडून चांगली सेवा आजही मिळत असली तरी त्यांचे कौटुंबिक जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा या अगोदर ही आपण वेळोवेळी केलेला होता. या सोसायटीच्या माध्यमातून जवळपास १८५ लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे.
