Breaking News

ग्राहक केंद्राकडून ग्राहकांना तप्तर सेवा मिळणार - केकाण


पानेगाव ( प्रतिनिधी )- युवकांसाठी रोजगारा बरोबरच भारतीय स्टेट बँकेच्या व्यतिरिक्त अन्य राष्ट्रीय कृत बँकेच्या सुविधा ग्राहकांना तप्तर सेवा ग्राहक सेवा केंद्रा कडुन मिळणार असल्याचे पानेगाव भारतीय स्टेट बँकेचे मँनेजर किरण केकाण यांनी सांगितले. स्टेट बँकेच्या मिनी बँकेच्या पानेगाव (ता.नेवासा) शाखेच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच संजय जंगले हे होते. जंगले यांनी गावामध्ये लवकरात लवकर ए.टी.एम.सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. यावेळी स्टेट बँकेचे रोखपाल सतिश मोरे, नामदेव घोलप, मेजर गोकुळदास चिंधे,जालिंदर जंगले,आबासाहेब गुडधे,उपसरपंच रामभाऊ जंगले, माजी सरपंच हौशाबापू जंगले, डॉ. कडुबाळ काकडे, बाळासाहेब घोलप, साहेबराव जंगले, राजेंद्र जंगले, रमेश गुडधे, प्रस्ताविक ग्राहक सेवा केंद्राचे संचालक विवेक जंगले यांनी केले. सुत्रसंचालन दादासाहेब जंगले यांनी केले. आभार संजय जनार्दन जंगले यांनी मानले.