Breaking News

शिक्षकांनी निवृत्तीनंतर समाजकार्य करावे - उपाध्यक्षा राजश्री घुले

दहिगाव नेे प्रतिनिधी, दि. 11, एप्रिल -  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतुन एक आदर्श विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक तन मन लावून करत असतो. आई वडीलांनंतर खर्‍या अर्थानं विद्यार्थ्यांचे पालन हे शिक्षकच करतात. अहोरात्र ज्ञानदानाचे काम करणारे शिक्षक एक आदर्श असतात. अशा आदर्श शिक्षकांचे सेवानिवृत्ती निमित्त सन्मान करणे आपले कर्तव्य असुन निवृत्ती नंतर शिक्षकांनी समाजकार्य करावे त्याने समाज सुधारण्याचे मोलाचे काम होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी केले. शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळचे मुख्याध्यापक नबाजी ढोले यांचा सेवानिवृत्ती बद्दल सपत्नीक सन्मान उपाध्यक्षा राजश्री घुले व सभापती डॉ. क्षितीज घुले यांचे शुभहस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात घुले यांनी आदर्शवत शिक्षकांविषयी गौरवोद्गार काढले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुलींच्या समूहगीत सादरीकरणाने सुरवात झाली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती श्री डॉ क्षितीज घुले, माजी सभापती छायाताई बाळासाहेब धोंडे, गटविकास अधिकारी बंकट आरले , गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ , शिक्षक बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सत्कार मुर्ती नबाजी ढोले यांनी सांगितले की 1984 सालापासून शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. अनेक बरे वाईट अनुभव आले. मात्र लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या कृपाआर्शिवादाने दहिगाव ने भागात केलेल्या शिक्षक सेवेत मात्र आनंदी वातावरण राहीले असुन घरच्या माणसाबरोबर राहत असल्याचा अनुभव आल्याचे भावनिक उदगार यावेळी ढोले यांनी व्यक्त केले. नबाजी ढोले यांनी आपल्या कार्यकाळात जोडलेला मित्र परिवार त्यांच्या सन्मान सोहळ्यास आवर्जून उपस्थित होता. कार्यक्रमास माजी सभापती श्री बाळासाहेब धोंडे, सरपंच सतिष धोंडे, उपसरपंच संजय जगदाळे ,सेवा सोसायटी अध्यक्ष बबनराव जगदाळे उपाध्यक्ष सोमनाथ सामृत , राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉ अरूण पवार, विस्तार अधिकारी रामकिसन जाधव, केंद्र प्रमुख श्री राजेश साबळे, प्रा. संजय भुसारी, ग्रामसेवक भारत खाटीक, भाविनिमगाव सरपंच पांडुरंग मरकड, ज्ञानेश्‍वरचे माजी संचालक मिलिंद कुलकर्णी, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब मरकड, शहरटाकळी विद्यालयाचे माजी प्राचार्य लवांडे सर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस मठाचीवाडी शाखा अध्यक्ष अशोक वाघ, रामजी शिदोरे, सुनिल जगदाळे, विलास लोखंडे, आदिनाथ वावरे, महावीर खुळे, आदर्श शिक्षक रामभाऊ गवळी, रामजी खरड, झुंबर चव्हाण, संजय काळे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाउपाध्यक्ष शंकर मरकड, पत्रकार अशोक वाघ, गणेश मुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे संतोष वाघ, एकनाथ पवार, गवाजी नारळकर, आबासाहेब शिरसाठ आदींसह मोठया संख्येने विद्यार्थी ग्रामस्थ  यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती बाळासाहेब धोंडे यांनी केले . सुत्रसंचालन सुखदेव आरोळे व शरद तांबे यांनी केले तर आभार गणेश जगदाळे यांनी व्यक्त केले.