Breaking News

नाटय परिषद व माऊली सभागृहाचे "बालनाट्य शिबीर" सुरू.

अ'नगर - अखिल भारतीय मराठी नाटय परिषद, अहमदनगर जिल्हा शाखा व तलाठी संघाचे माऊली सभागृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले १० दिवसाचे हसत खेळत "बालनाट्य शिबीर" सुरु झाले आहे अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष सतीश लोटके यांनी दिली. या ऊदघाटन प्रसंगी माऊली सभागृहाचे श्री.हिगें, घोडके, श्री. निमसे,नाटय परिषदेचे ऊपाध्यक्ष दिपक शर्मा,कार्याध्यक्ष शशिकांत नजान, सहकार्यवाह अविनाश कराळे,शेखर वाघ,रितेश सांळुके,तुषार बुगे,योगेश विलायते, काशीनाथ सुलाखे अदि. ऊपस्थीत होते. बालनाट्य शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला असुन यात अनेक दिग्गज नाटयकर्मी मार्गदर्शन करणार आहेत. शिबीरात अभिनय, सुत्रसंचालन, सभाधिटपणा याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्या शिबीरार्थीनां सहभाग नोदंवायचा असेल त्यांनी माऊली संकूल येथे संपर्क साधावा अशी माहिती संचालिका ऊर्मिला लोटके यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर मेहेत्रे यांनी केले.