Breaking News

कांडेकर सरांना भास्कराचार्य गौरव पुरस्कार प्रदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयाचे शिक्षक उत्तम कांडेकर यांना अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा थोर गणित तज्ञ भास्कराचार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक कल्याण ठोंबरे, केशव गुंजाळ, परिक्षा प्रमुख नवनाथ घुले, तोडमल सर आदि उपस्थित होते.


कांडेकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, सचिव भागचंद जाधव, प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे, डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सचिव मंदाताई डोंगरे, काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, गोविंद बोरुडे, दत्तात्रय जाधव, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, शुभांगी धामणे, मंदा साळवे, तुकाराम खळदकर, लहानू जाधव आदिंसह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.