Breaking News

‘रंगेल’ पतीविरुद्ध संतप्त पत्नीची फिर्याद पोलिसांनी केला गुन्हा दाखल

पतीने शेजारच्या अल्पवयीन मुलीबरोबर अनैतिक संबंध ठेवून एक अपत्य जन्माला घातले. याचा जाब संतापलेल्या पत्नीने विचारला असता पतीने पत्नी आणि मुलीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सदर पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील वांबोरीजवळ कात्रड गावात सुरेखा दिलीप दांगट (वय : ४०) आणि दिलीप सखाराम दांगट हे दांपत्य राहते. त्यांना एक मुलगीही आहे. मात्र पती दिलीप याचे शेजारीच राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीबरोबर अनैतिक संबंध होते. त्या संबंधातून त्या मुलीला एक मुलगाही झाला. याबाबत पती दिलीप याला पत्नी सुरेखा हिने वेळोवेळी जाब विचारला. मात्र, पतीने सुरेखा व तिच्या मुलीला मारहाण करून व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. नवर्‍याचा असा प्रताप पाहून संतापलेल्या पत्नीने राहुरी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरूद्ध लग्नाची बायको असताना अल्पवयीन मुलीबरोबर शारीरिक संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.